गाव नमुना ७ म्हणजे अधिकारपत्रक होय तसेच गाव नमुना १२ म्हणजे पीक -पाणी पत्रक हे दोन्ही पत्रक मिळून ७/१२ उतारा तयार होतो .
१) भूधारणा पद्धत
भोगवटादार वर्ग -१
जमीन भूधारणा रकान्यामध्ये वर्ग -१ असा शेरा असेल तर सदरच्या जमिनीची खरेदी विक्री करताना कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी घ्यावी लागत नाही.
भोगवटादार वर्ग - २
जमीन भूधारणा रकान्यामध्ये वर्ग -२ असा शेरा असेल तर सदरच्या जमिनीची खरेदी विक्री करताना संबंधित शासकीय कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते जसे की तहसिलदार कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय .वर्ग -२
च्या जमिनी ह्या इनामी, वतनी ,सरकारी गायरान ,देवस्थान, शासनाने भाडेपट्टाने दिलेल्या जमिनी इत्यादी
जमिनीचे क्षेत्रफळ
जमिनीचे क्षेत्रफळ हे हेक्टर ,आर ,चौरस मीटर अशा प्रकारे दर्शवतात.
👉 एक हेक्टर =९८.८० आर= १०,००० चौरस मीटर
👉 एक एकर =४० आर= ४००० चौरस मीटर
👉 एक आर =१०८९ चौरस फूट/ एक गुंठा
जिरायत क्षेत्र
जिरायत क्षेत्र म्हणजे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असलेले जमिनीचे क्षेत्रफळ
बागायत क्षेत्र
बागायत क्षेत्र म्हणजे जमिनीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी बारमाही पाणी असलेले जमिनीचे क्षेत्रफळ.बागायती जमिनी
मध्ये बारा महिने पिके घेतली जातात.
पोटखराबी क्षेत्र
लागवडी योग्य नसलेले क्षेत्र म्हणजे पोटखराब क्षेत्र अशा जमिनीमधून कोणतेही उत्पन्न मिळत नाही
इतर हक्क
ह्या रकान्यामध्ये वारस नोंद ,कुळाविषयी माहिती ,अटी शर्ती , आदेश अशी माहिती असते
गाव नमुना १२
गाव नमुना १२ मध्ये पीक पाण्याबद्दल माहिती दिलेली असते जसे कि दरवर्षी जमिनी मध्ये येणारे पीक उदा . भात , ऊस ,कापूस तसेच सिंचनाची माहिती दिलेली असते.

No comments:
Post a Comment